टीम मंगळवेढा टाईम्स ।
माझे नेते अजीत पवार आहेत मुख्यमंत्र्याचं काय जाऊ दया तिकडं मरू दया तिकडं, असे वक्तव्य करताना सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणेमामा यांची एका कार्यक्रमा प्रसंगी भाषणातून महापौर श्रीकांचना यन्नम यांना उद्देशून बोलताना अचानकपणे जीभ घसरली.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहीम मी त्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पाच मधील देगाव देगाव रोड येथे ४३ एकर जागेवर गटनेता आनंद चंदनशिवे यांचा भांडवली
निधीतून वीस हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमात आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांना भरभरुन कौतुक केलं त्यांना मुख्यमंत्री व्हा, असे म्हणत कौतुक केले, त्यानंतर पालकमंत्री भरणे यांनी चंदनशिवे दादा मला खूप काही मिळाला आहे.
तुम्हाला काय द्यायचं आशीर्वाद तो माझ्या अजितदादांना द्या असे म्हणत महापौरांशी बोलताना थेट मुख्यमंत्री मरु द्या असे वादग्रस्त वक्तव्य केले.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या माझी वसुंधरा अभियान कार्यक्रमातच पालकमंत्री भरणे यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने उपस्थित पत्रकारांसह सर्व प्रशासनातील अधिकारी आवाक झाले.
माजी मंत्री तानाजी सावंतांचा भरणे यांना इशारा
दरम्यान, सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दत्तात्रय भरणे यांना सज्जड दम दिलाय. भरणे मामा तुम्ही औकातीत राहा.
आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरे यांच्या जिवावर तुम्ही सत्तेत आहात. तुम्हाला जनतेनं फेकुन दिलं होतं. भरणे यांची हिम्मत असेल तर त्यांनी उजनीची सीमा ओलांडून दाखवावी.
शिवबंधनाची ताकद पहायची आहे का. महाविकास आघाडी आहे आणि आमच्यावर बंधन आहे म्हणून आम्ही शांत आहोत. आमच्यावर काही बोलून छातीवर ठोकायची वेळ येऊ देऊ नका. भरणे यांना योग्य वेळी शिवसैनिकांच्या माध्यमातून उत्तर देऊ, असा इशाराच तानाजी सावंत यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री आमचे नेते आहेत
मुख्यमंत्री आमचे नेते आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. आता भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर स्थानिक पातळीवर सुरु झालेल्या या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज