टीम मंगळवेढा टाईम्स ।
पूजन करून महिला घराकडे परतत असताना, दिवसा ढवळया महिलांच्या घोळक्यातून अज्ञात चोरटयाने चक्क पोलिसाच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे साडेचार तोळयाचे मंगळसूत्र गंठण चोरून अज्ञात चोर गायब झाला.
ही घटना सांगोला शहरातील पुजारवाडी येथे गुरुवार घडली आहे. सिनेस्टाइलने चोरी करून अज्ञात चोरटयाने पोलिसांसमोर एक आव्हान ठेवले आहे.
पुजारवाडी येथे माळीसमाज एकत्रित वास्तव्यास असून हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. अशा ठिकाणी सणावाराच्या वेळी समूहाने महिला हळदी कुंकवासाठी एकत्रित जमा होऊन सर्व कार्यक्रम पार पाडत असतात.
गुरुवारी वटपौर्णिमा सणाच्या निमित्ताने महिला वर्ग वडपूजनाच्या व हळदी कुंकवाच्या निमित्ताने बाहेर पडला होता. या संधीचा फायदा घेऊन पुजारवाडी येथे दाट वस्तीच्या ठिकाणी भर दुपारी चोरटयाने पुजारवाडीत रहिवासी असलेल्या पोलिसांच्या पत्नीच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे.
यामुळे पोलिसांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर , इतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा काय ? असाही सवाल नागरिकांच्या घटना चर्चेमधून समोर आला. येथे चोरट्याने सिनेमा स्टाइलने चोरी करून दुचाकीवर धूम ठोकल्याने या अज्ञात चोरटयाला पकडण्यात नागरिकांना व पोलीस पतीला अपयश आले.
याबाबत पोलिसात गुन्हा दाखल झाला की नाही यासंदर्भात उशिरापर्यंत माहिती मिळाली नसल्याचे आमच्या प्रतिनिधींनी सांगितले. मात्र सिनेस्टाइलने चोरी करून अज्ञात चोरट्याने पोलिसांसमोर एक आव्हान ठेवले आहे.
एव्हडे मात्र नक्की आहे . चैन स्नॅचिंगच्या या प्रकरणाचा सांगोला पोलीस किती दिवसात छडा लावणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.(स्रोत:पुण्यनगरीत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज