टीम मंगळवेढा टाईम्स ।
शंभर कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने पुन्हा छापेमारी केली असून आज सकाळपासून ही चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीसोबत केंद्रीय सुरक्षा पथक देखील दाखल झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. तसेच त्यांच्या निकटवर्तीय यांच्या घरावर देखील छापेमारी केली होती. आता परत ईडी अनिल देशमुखांच्या घरी पोहोचली आहे.
दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच अनिल देशमुख हे काही दिवसानंतर तुरुंगात असतील, असाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

‘परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई केली आहे. आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने १०० कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. परमबीर सिंह यांनी ही तेच म्हटले. पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. मग CBI धाडी कशावर टाकत होती?
पैसे दिलेच नाही तर ED कशाला? आणि जर पैसे दिले असे CBI व ED चे म्हणणे असेल तर परमबीर सिंह व वाझेवर कारवाई का नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे हे स्पष्ट आहे. जनता ही आता हे ओळखून आहे. या राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाला आहे.” असे काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले होते.
‘अनिल देशमुखांचा तपास ED कडे गेला हे उत्तमच. आता राज्यात वसूल केलेला खंडणीचा पैसा कोलकात्यातील बोगस कंपन्यामार्फत कसा फिरवला गेला हे उघड होईल. दूध का दूध, पानी का पानी”, असे भाजपचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज