टीम मंगळवेढा टाईम्स ।
वाळूच्या पकडलेल्या ट्रॉलीवर कारवाई न करता तो सोडण्यासाठी व वाळूचा हफ्ता साहेबाना देण्यासाठी साहेबांचे नाव सांगून 30 हजाराची लाचेची मागणी करून आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरनी मंगळवेढा येथील पोलीस नाईक संतोष चव्हाण यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक करून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद नोंदवला आहे.
माण व भीमा नदीतून महसूल व पोलिसणाच्या आशीर्वादाने मोठया प्रमाणात वाळूची तस्करी होत असून पोलीस मात्र आपले हात ओले करून घेत आहेत बोराळे येथील तक्रारदार ची वाळूची ट्रॉली पोलिसांनी पकडली होती.
परंतु ती सोडवण्यासाठी पोलिस वरिष्ठांचे नाव सांगून 30 हजार रक्कम मागत असल्याची तक्रार चौगुले यांनी लाचलुचपत विभागाकडे केली होती तसे तक्रारदार व पोलीस नाईक यांचे संभाषण देखील झाले होते.
त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार चौकशी केली असता वाळूच्या पकडलेल्या ट्रॉलीवर कारवाई न करता तो सोडण्यासाठी व वाळूचा हफ्ता साहेबाना देण्यासाठी साहेबांचे नाव सांगून 30 हजाराची लाचेची मागणी करूनआर्थिक फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने
मंगळवेढा येथील पोलीस नाईक संतोष चव्हाण यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक करून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याने खळबळ उडाली आहे.
मंगळवेढा पोलीस सध्या या ना त्या कारणाने सध्या चर्चेत असून येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे येथील पोलिसांवर नियंत्रण नसल्याने येथील पोलीस खाते दिवसेंदिवस अधिक बदनाम होत असल्याने वरीष्ठ काय भूमिका घेतात याकडे येथील नागरिकांचे लक्ष आहे.
या प्रकारामुळे शहर व तालुक्यात मात्र मोठी खळबळ उडाली असून सर्वसामान्य जनतेचे रक्षण करणारेच आता वरिष्ठ साहेबांच्या नावाखाली लाच घेत आहेत .
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक एसीबी , सोलापूर कविता मुसळे यांच्याकडे देण्यात आला असून पुणे , एसीबी पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , अप्पर पोलीस अधीक्षक , पुणे सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक एसीबी सातारा अशोक शिर्के , पोलीस नाईक विनोद राजे , पोकॉ काटकर व भोसले यांच्या पथकाने केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज