टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरणातील पाण्याचा उपयुक्त साठा संपत चालला असून तळ गाठण्याच्या मार्गावर आहे. सध्या मृत संचयाच्या वर केवळ 3.5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
अजूनही कालव्यातून 3 हजार क्यूसेक विसर्ग सुरूच असून, दोन दिवसात हे पाणी संपेल. त्यामुळे पाणीसाठा मृतसंचयाखाली जाणार आहे.
परिणामी सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पाणी योजना पूर्ण बंद होणार आहेत. पुढे पावसाळ्यात धरणात पाणी भरल्यानंतर या योजना पुन्हा सुरू होऊ शकतील.
दोन वर्षापूर्वी 15 मे 2019 रोजी उजनी धरण उणे 38 टक्के होते. तर पाणीसाठा 43.16 टीएमसी होता. त्या तुलनेत या वर्षी सोमवार 10 मे 2021 रोजी धरणात अचल पाणीसाठा 1.92 टीएमसी आहे.
पावसाळा सुरू होईल इतपत समाधानकारक पाणीसाठा धरणात असल्याने सिंचनाचा व पाणीपुरवठ्याचा प्रश्न उद्भवणार नसला तरी सध्या मुख्य कालव्यातुन 3 हजार 150 क्युसेक तर दहिगाव उपसा सिंचन क्युसेक ने विसर्ग धरणातुन चालू आहे.
त्यामुळे पावसाळा चालू होईपर्यंत आणखी किती पाणीसाठा खालावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उजनी धरणाच्या 123 टीएमसी पाणीसाठ्यापैकी 54 टीएमसी पाणी उपयुक्त तर 63 टीएमसी हा मृतसाठा धरला जातो, तर 6 टीएमसी पाणी अतिरिक्त पाणी आहे.
कारण उजनी धरण 100 टक्के भरते. त्यावेळी 117 टीएमसी पाणी असते आणि 111 टक्के पाणी साठवले जाते त्यावेळी पाणीसाठा 123 टीएमसी होते. सध्या उजनी धरणातील 63 टीएमसी पाणी संपले गेले.
उजनी धरणातील पाण्यावर किमान 45 साखर कारखाने, व दहा औद्योगिक वसाहती चालतात. तसेच सोलापूर शहरासह शेकडो गावांचा पाणीपुरवठा याच धरणाद्वारे होतो, तर हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय ही होते.
यामुळे उजनी धरणाला राजकीय, अर्थिक व सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असल्याने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष उजनीच्या पाण्यावर लागून असते.(सकाळ)
चालू वर्षी उजनी धरणातील सध्याची पातळी
एकूण पाणीपातळी :490.990 मीटर
एकूण क्षेत्रफळ : 196.81 चौ. कि. मी.
एकूण पाणीसाठा : 1856.83 दलघमी
उपयुक्त साठा : -54.02 दलघमी
एकुण पाणीसाठा : 65.56 टीमसी
उपयुक्त साठा : 1.91 टीमसी
टक्केवारी : 3 टक्के
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज