टीम मंगळवेढा टाईम्स ।
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कोरोना काळात चोरून चालणाऱ्या जिल्हयातील अवैध धंद्याचा आढावा घेवून वाळू व इतर अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या पथकाने मंगळवेढ्यात देशी व विदेशी दारुच्या विक्रीवर छापा टाकून कारवाई केली असून राजेश शिवाजी सूर्यवंशी (50) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरे व त्यांच्या टिमला बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनूसार मंगळवेढा येथील सुर्यवंशी वस्ती , पंढरपूर रोड येथील एक इसम हा आपल्या राहत्या घरी देशी विदेशी दारूची मोठया प्रमाणात विक्री करीत आहे.
सहा.पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना कळविले असता त्यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले . सुर्यवंशी वस्ती येथे मध्यम वयस्कर इसम हा घरासमोर खूर्चीवर बसून देशी विदेशी दारूची अवैधरित्या विक्री करीत असल्याची खात्री झाल्यानंतर सदर ठिकाणापासून काही अंतरावर वाहन थांबवून पायी चालत या ठिकाणी पथक गेले असता त्या ठिकाणी मोठया प्रमाणात अवैधरित्या देशि विदेशी दारूचा साठा घरातील लाकडी दिवाणमध्ये ठेवलेला मिळून आला.
२९ हजार ५९७ रुपयांच्या मॅकडॉल नंबर १ विस्की व रम, इम्पिरिअल ब्लू विस्की, रॉयल स्टॅग विस्की , डीएसपी ब्लॅक विस्की , ब्लेन्डर प्राईड विस्की , बॅग पाईपर , देशी संत्रा , सिग्नेचर विस्की , अॅन्टीक्युटी विस्की , ब्लेन्डर प्राईडच्या एकूण १८८ बाटल्या व १४ हजार ४४० रुपयांच्या देशी विदेशी बाटल्या विकून आलेली रोख रक्कम असे एकूण ४४ हजार ३७ रुपयांचा मुद्देमाल या ठिकाणी मिळून आला.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सफौ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.
ढाब्यावर कृषी केंद्राचा बोर्ड लावून दारू विक्री ढाबेवाल्याने लढविली शक्कल मात्र पोलिसांनी केली कारवाई
लॉकडाउन सुरु असल्याने फक्त मेडिकल आणि शेतीसंबंधी व खत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सवलतीचा फायदा घेत सोनके येथील ढाबेवाल्याने आपल्या हॉटेलवर ‘जय मल्हार ॲग्रोटेक’चा बोर्ड लावून अवैद्य दारु विक्रीचे दुकान थाटले.
पण पंढरपूर ग्रामीण पोलिसांना याचा सुगावा लागताच या बोगस दुकानावर छापा टाकून पोलिसांनी विविध कंपन्यांची दारू जप्त केली असून दारू गुत्तेदार काशीलिंग उर्फ लिंगाप्पा कोळेकर याला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.
पंढरपूर तालुक्यातील सोनके गावच्या वेशीवर सुरुची ढाबा होता. लॉकडाउनमध्ये ढाबा बंद करण्याच्या सूचना आल्याने ढाबा लिंगाप्पा कोळेकर याने आपल्या हॉटेल कम ढाब्याच्या दुकानावर चालक ‘जय मल्हार ॲग्रोटेक’ नावाचा बोर्ड लावून या दुकानात शेती औषधे व खत विक्री केले जात असल्याचा भास निर्माण केला.
अवैद्य दारू विक्रीची तालुक्यात कडक अंमलबजावणी होत असताना कोळेकर या नामी युक्ती शोधून आपली दारू विक्री सुरु ठेवली होती. या दुकानाकडे पाहताक्षणी औषधी दुकान असल्याचा भास होत होता.
मात्र या औषध दुकानातील बॉक्समध्ये विविध कंपन्यांच्या दारुच्या बाटल्या ठेवलेल्या पोलिसांना आढळून आल्या असून २५०० रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पंढरपूर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या पथकातील पोलिस शिपाई विलास घाडगे, विशाल भोसले यांनी केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज