टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. समाधान आवताडे यांच्याविरोधात त्यांचेच चुलत बंधू खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे हे उभे राहिले आहेत.त्यांची मनधरणी करण्यासाठी आलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहित पाटील व आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले आहे.
मंगळवेढ्यात आज खरेदी विक्री संघावर तब्बल दोन तास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे.
याप्रसंगी माजी सभापती राजाराम जगताप,दामाजी कारखान्याचे माजी अध्यक्ष सूर्यकांत ठेंगील, जयंत साळे, बाबासाहेब कोंडुभैरी,विजय बुरकुल आदीजन उपस्थित होते.
दरम्यान बबनराव आवताडे यांनी कार्यकर्त्यांना प्रचार यंत्रणा राबविण्याच्या सूचना या बैठकीनंतर दिल्या आहेत.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व विधानपरिषद आ.रणजितसिंह मोहिते पाटील हे आज जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांची मनधरणी करण्यासाठी मंगळवेढ्यात आले होते.
बबनराव आवताडे यांच्या कार्यक्रमात तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा सुरू होती.मात्र बबनराव आवताडे यांनी निवडणूक लढणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे.
दरम्यान या बैठकीत नंतर मतदारसंघात आपण विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढवत असल्याचे उमेदवार सिध्देश्वर आवताडे यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज