मंगळवेढा टाईम्स टिम । राज्यातील शेतकरी चिंतामुक्त व्हावा व शेतकरी केंद्रीत कृषि विकास साधल्या जावा या उद्देशाने “विकेल ते पिकेल” अंतर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व परिवर्तन अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे.
कृषि विषयक विविध योजना संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 ते 1.30 यावेळेत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषि मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषि आयुक्त धीरज कुमार उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम online होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाच्या युट्युब चॅनेलवरून करण्यात येणार आहे. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
कृषि, महसूल व ग्रामविकास विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी ग्रामपातळीवर स्थानिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण कृषि विभागाच्या http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या यु-ट्युब चॅनेलवर करण्यात येणार आहे.
‘विकेल ते पिकेल’ अभियान शुभारंभ व बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिर्वतन प्रकल्प (SMART) या जागतिक बँक अर्थसहाय्यीत प्रकल्पाचा शुभारंभ यावेळी करण्यात येईल.
या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ग्रामपातळीवरील कृषि विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून ‘चिंतामुक्त’ शेतकरी व ‘शेतकरी केंद्रित’ कृषि विकास यावर विचार व्यक्त करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
या ऑनलाईन संवादात मुख्यमंत्री ग्रामपातळीवरील कृषि विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून चिंतामुक्त शेतकरी व शेतकरी केंद्रीत कृषि विकास विचार मांडतील व शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
ज्या शेतकरी बांधवांकडे नेट आहे अशा शेतकरी बांधवांनी या लाईव्ह संवादास आवर्जून हजेरी द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Chief Minister Uddhav Thackeray will interact with farmers on the policy of ‘sell to pickle’
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज