टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरणातून कालव्याद्वारे 20 ते 21 मार्च रोजी तर भीमा नदीला 23 तारखेस उन्हाळी आवर्तन सोडणार असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
दरम्यान, राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आमदार बबनराव शिंदे यांनी उन्हाळी आवर्तन तातडीने सोडण्याची आग्रही मागणी केली होती.
कालवा,भीमा नदी यासोबतच सीना नदी, सीना-माढा उपसा सिंचन या योजनांनादेखील पाणी सोडले जाणार आहे.उन्हाळ्याची तीव्रता सध्या जाणवू लागल्यामुळे कालव्याला व नदीला पाणी सोडण्याची मागणी होत होती.
प्रत्येक भागातून शेतकरी आ.शिंदे यांना पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी करत होते.त्यातच शेतकर्यांना गेले वर्षभर झाले कोरोनामुळे प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला आहे.
शेतमालाला योग्य प्रमाणात भाव मिळत नाही. मार्च महिना लागल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. पाण्याअभावी शेतातील पिके सुकू लागली होती. त्यामुळे आ.बबनराव शिंदे यांनी शेतकर्यांच्या हिताचा विचार करून पाठपुरावा केला व या मागणीला यश मिळाले आहे. या निर्णयामुळे शेतकरीवर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.
उजनी धरणात सद्यस्थितीला प्लस 64 टक्के पाणीसाठा आहे. धरणात पाणी मुबलक असल्याने शेतकर्यांच्या पिकांना फायदा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. या पाण्यामुळे ऊस, केळी, द्राक्ष, मका, भुईमूग, मूग, भाजीपाला लागवडीस फायदा होणार आहे. हे आवर्तन संपल्यावर उन्हाळी हंगामासाठीच दुसरे आवर्तनही सोडण्यात येणार असल्याचे आ. बबनराव शिंदे यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज