राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी अक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष कटेकर यांना तोंडाला काळे फासून मारहाण केल्या प्रकरणी शिवसेनेचे शहर प्रमुख रवी मुळ यांच्यासह इतर 20 ते 22 जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दि.5 फेब्रुवारी रोजी वीज वितरण कंपनीच्या विरोधात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलना दरम्यान भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष कटेकर यांनी भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याची व्हिडिओ क्लिप शनिवारी 6 जानेवारी रोजी समाज माध्यमात व्हायरल झाली होती.
त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचे शिवसैनिकांमधे तीव्र पडसाद उमटले होते. त्यातूनच शनिवारी 6 फेब्रुवारी रोजी येथील शिवसैनिकांनी शिरीष कटेकर यांच्या अंगावर शाई टाकून, तोंडाला काळे फासून त्यांना मारहाण देखील केली होती.
या घटनेची भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार राम कदम यांनी दखल घेऊन मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर रात्री उशिरा शिवसेनेचे शहर प्रमुख रवी मुळे, संदीप केंदळे, सुधीर अभंगराव, सिधू कोरे, जयवंत माने यांच्यासह इतर 20 ते 22 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण पवार हे करीत आहेत.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज