टीम मंगळवेढा टाईम्स ।
येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहेत अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.राज्यातील महाविद्यालय पुन्हा सुरु करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती.
याबाबत काही बैठका देखील पार पडल्या. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मागणीनंतर यूजीसीच्या गाईडलाईन्सनुसार येत्या 15 फेब्रुवारीपासून 50 टक्के उपस्थितीमध्ये आम्ही कॉलेज सुरू करत आहोत, असं सामंत म्हणाले.
महाविद्यालय उशिरा सुरू होणार असल्याने त्याचे परिणाम निकालावर थोड्या प्रमाणात होतील, असंही उदय सामंत यांनी सांगितलं.टप्प्या-टप्प्याने महाविद्यालये सुरु होणार असून ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे निर्बंध घालण्यात आले आहे.
दरम्यान, विद्यापीठांच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत. कॉलेज प्रत्यक्षरित्या सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. यावर देखील उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.
परीक्षा या विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी अशी चर्चा विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत झाली होती.
परीक्षा या ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने घेण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार परीक्षा पद्धतीचा निर्णय हा विद्यापीठांवर सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना कॉलेज हे ऑफलाईन(प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन) व ऑनलाईन, जे विद्यार्थ्यांच्या सोयीचे असेल त्याची व्यवस्था करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.
तर, कॉलेजमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असते. मात्र, यंदा हे निर्बंध नसणार आहेत.
याबाबत उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. तसेच, यूजीसीच्या नियमांनुसारच कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज