भाजपमधील अनेक नेते संपर्कात असल्याचा रोहित पवारांचा निर्वाळाः परिचारक की आवताडे यावर खल
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी टाकलेली गुगली येथील राजकारणात नवा पेच निर्माण करणारी आहे. कारण पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी भाजपा आमदार व नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे पवारांनी सांगितले.
त्यामुळे आ. प्रशांत परिचारक की, समाधान अवताडे यापैंकी कोण राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे ? अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार स्व.भारत भालके यांच्या निधनानंतर लवकरच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागणार आहे. अशातच या मतदारसंघामध्ये आ. स्व. भारत भालके यांचे पूत्र भगिरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देऊ करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून आहे.
याबाबत खा. शरद पवार यांनी गत महिन्यातील पंढरपूर दौऱ्यात योग्य वेळी निर्णय घेऊ असे सुचित केले होते. यानंतर आता आ. रोहित पवार यांनी सर्वेक्षण करून जनतेच्या मनातील उमेदवार असेल तसेच पवार साहेबांच्या मनात एक उमेदवार आहे अन् भाजपामधील आमदार व इतर नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगितल्यामुळे नव्या चर्चाना तोंड फुटले आहे.
साधारणपणे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी राष्ट्रवादीशिवाय दावेदार मानले जाणारे आ. प्रशांत परीचारक एकमेव भाजपा आमदार आहेत. त्यामुळे रोहित पवारांच्या वक्तव्यातील इशारा हा परिचारकांकडे होता की, इतर कुणाकडे ? हा सध्या उत्सुकतेचा विषय आहे.
पण राजकीय पंडिताच्या मतानुसार परिचारक यांचे राष्ट्रवादीशी जुने संबंध आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची सलगी पवारांशी होऊ शकते. असा एक तर्क आहे.
एकीकडे परिचारक यांच्या नावाची चर्चा होत असताना,
दुसरीकडे मंगळवेढय़ाचे समाधान अवताडे देखिल राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करू शकतात असा एक कल आहे. कारण आवताडेंपूर्वी राष्ट्रवादीमध्येच होते. यानंतर त्यांची शिवसेना आणि भाजपाशी सलगी होती. अशातच विधानसभा निवडणुकीतील आवताडे यांना पराभूत होऊनही मिळालेल्या मतांची गोळाबेरीज पाहता, राष्ट्रवादीकडून आवताडे देखिल राष्ट्रवादीत प्रवेश करून मतदारसंघाच्या दृष्टेने बेरजेच्या राजकारणाचे गणित घालू शकतात असे बोलले जात आहे.
पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जरी कुठल्याही भाजपामधील नेत्यांस राष्ट्रवादीने प्रवेश दिला. तर संबधित नेत्याला उमेदवारी दिली जाणार का ? हा मुख्य निर्णायक प्रश्न आहे.
कारण पवारांचे आजमिती पर्यंतचे राजकारण पाहता, इतर नेत्यांना पक्षात घेऊन, पक्षांची ताकद वाढवण्याची देखिल रणनिती त्यांची असू शकते. सरतेशेवटी भालके कुंटुबियांपैकीच एकास उमेदवारी देऊन दिवंगत आमदार स्व.भारत भालके यांना राष्ट्रवादीकडून श्रद्धांजली वाहिली जाऊ शकते. असा एक मतप्रवाह आहे.(तरुण भारत सवांद)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज