टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील खैराट येथील शेतकरी ग्रामविकास आघाडीचे उमेदवार सायबण्णा धानप्पा बिराजदार यांचे निधन झाले आहे.
याबाबतीत मिळालेली अधिक माहिती अशी, की खैराट येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक तीन येथे शेतकरी ग्रामविकास आघाडीकडून निवडणूक लढवीत असलेले सायबण्णा बिराजदार यांची प्रकृती काल रात्री अचानक बिघडली.
त्यामुळे त्यांना सोलापूर येथील एका खासगी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. पण उपाचाराला प्रतिसाद न मिळाल्याने आज मतदाना दिवशीय पहाटे चार वाजता त्यांचे निधन झाले.ते 58 वर्षांचे होते.
काल दिवसभर ते आपल्या प्रचारात सक्रिय होते. आपल्या प्रभाग क्रमांक तीन येथील मतदारांच्या गाठीभेटी देखील त्यांनी घेतल्या होत्या. त्या वेळी त्यांची प्रकृती ठीकच होती, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
अचानक त्यांची प्रकृती रात्री बिघडली व त्यांचे निधन झाले. या अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप त्यांचा मृतदेह सोलापूर येथून गावी आणण्यात आला नव्हता.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज