टीम मंगळवेढा टाईम्स ।
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या म्हणजे फॉर्म नंबर १७ भरून नावनोंदणी करण्यासाठी ११ जानेवारीपासून अर्ज करता येईल.
यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदत असून, हे अर्ज आणि शुल्क ऑनलाइन भरावे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.
अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शुल्क भरल्याची पावती तसेच मूळ कागदपत्रे संबंधित शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायचे आहे. यासाठी १२ ते २७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
तसेच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याच्या पावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे आणि यादी विभागीय मंडळाकडे दोन फेब्रुवारीपर्यंत जमा करता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या प्राप्त अर्जातील दुरुस्त्या १० जानेवारीपर्यंत विभागीय मंडळामार्फत करण्यात येणार आहेत.यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी आपली शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
ऑनलाइन अर्ज भरताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५७०५२०७/ २५७०५२०८, तसेच इतर बाबींसाठी २५७०५२७१ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.
या संकेतस्थळावर भरा अर्ज
दहावीसाठी : http://form17.mh-ssc.ac.in
बारावीसाठी : http://form17.mh-hsc.ac.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज