टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान असून 18 जानेवारीला मतमोजणी झाली आहे. तत्पूर्वी, ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छूकांची गर्दी वाढू लागली आहे.
उमेदवारी अर्ज करणाऱ्यांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याची पोहोच त्यासोबत जोडणे बंधनकारक आहे.आता होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या टप्प्यात जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर इच्छूकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यांना जात पडताळणी समिती कार्यालयात पडताळणीसाठी प्रस्ताव द्यावा लागतो. तो प्रस्ताव दिल्याची पोहोच ग्रामपंचायत अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
खुला प्रवर्ग वगळता अन्य प्रवर्गातील इच्छूकांनी ती पोहोच न जोडल्यास उमेदवारी अर्ज अपात्र ठरू शकतो.त्यामुळे इच्छूकांची अडचण होऊ नये म्हणून जात पडताळणी कार्यालयाने 25, 26 आणि 27 डिसेंबरला सार्वजनिक सुट्ट्या आहेत. या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यास सुट्टी आहे.
मात्र, इच्छूकांना जात पडताळणी प्रस्ताव सादर केल्याची पोहोच या काळात दिली जाईल, असे पत्र जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीच्या उपायुक्त छाया गाडेकर यांनी काढले आहे.
या निर्णयामुळे इच्छूक उमेदवारांची सोय होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज