टीम मंगळवेढा टाईम्स ।
आज 1 डिसेंबर 2020 पासून नव्या महिन्याची सुरुवात झाली आहे. आजपासून आपल्या आर्थिक घडामोडींशी संबंधित काही महत्त्वपूर्ण बदल लागू होत आहेत, जे सर्वसामान्यांच्या जीवनाशी थेट संबंधित आहेत.
त्यामुळे आपल्या खिशाशी संबंधित गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा आपले नुकसानही होऊ शकते.
1 डिसेंबरपासून देशात काय बदल होणार आहेत ते जाणून घेऊया.
24 तास पैसे हस्तांतरित करता येणार
रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) सुविधा आजपासून 24 तास आणि सात दिवस उपलब्ध असेल.
म्हणजेच, आपण RTGS द्वारे वर्षाच्या 365 दिवसांतून कधीही पैशांचा व्यवहार करू शकता. रिझर्व्ह बँकेने (RBI) ऑक्टोबर महिन्यात RTGS 24 तास उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता.
ही सुविधा सुरू झाल्यावर भारत जगातील अशा मोजक्या देशांमध्ये सामील झाला आहे, ज्यांच्याकडे 24x7x365 मोठ्या मूल्याची रिअल टाइम पेमेंट सिस्टम असेल.
आता महिन्याच्या दुसर्या व चौथ्या शनिवार वगळता आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी RTGS सिस्टम सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध असेल.
एटीएममधून पैसे काढण्यासाठी OTP आवश्यक
पंजाब नॅशनल बँकेकडून (PNB) वन टाइम पासवर्ड (OTP) आधारित रोख पैसे काढण्याची सुविधा आजपासून लागू करण्यात आली आहे.
आजपासून एटीएममधून 10,000 पेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी ओटीपी आवश्यक आहे. या नियम रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत लागू असेल. अशा परिस्थितीत एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांजवळ त्यांचे मोबाइल फोन असणे आवश्यक आहे.
LPG सिलिंडरच्या किमती बदलणार
एलपीजी गॅस सिलिंडरची (LPG Gas Cylinder) किंमत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी अद्ययावत केली जाते. गेल्या सहा महिन्यांपासून यात कोणताही बदल झालेला नव्हता.
सध्या दिल्लीत 14 किलो विनाअनुदानित गॅसची किंमत 594 रुपये आहे. कोलकातात गॅस सिलिंडरची किंमत 620.50 रुपये, मुंबईत गॅस सिलिंडरची किंमत 594 रुपये आणि चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरची किंमत 610 रुपये आहे.
नवीन ट्रेन सुविधा सुरू
जबलपूर-नागपूर विशेष ट्रेन 1 डिसेंबरपासून सुरू होत आहे. लॉकडाऊननंतर त्याची सेवा बंद करण्यात आली होती. त्याचबरोबर मुंबई-हावडा डेली सुपरफास्ट ट्रेनचे काम पुन्हा सुरू होत आहे. 1 डिसेंबरपासून रिवा स्पेशल आणि सिंगरोली स्पेशल ट्रेनही चालविण्यात येणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज