mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

हे बेईमानीने आलेले सरकार आहे; आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल : फडणवीसांचे सूचक विधान

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 24, 2020
in राजकारण

अवघा महाराष्ट्र साखरझोपेत असताना वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजभवनावर शपथविधी पार पडला होता.

या प्रसंगावरून आज सोशल मिडियावर अनेक मिम्स व्हायरल होत असून दोन्ही नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल, असे सूचक विधान केले आहे.

त्यामुळे राजकीय वर्तुळात एका मागून एक चर्चा रंगू लागल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज औरंगाबादेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हे सरकार आणखी वीस वर्षे चालेले असे मुख्यमंत्री म्हणतात, या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, त्यांनी कितीही स्वप्न पाहिली तरी देखील त्यांना हे माहिती आहे की जनतेने त्यांना निवडून दिले नव्हते.

हे बेईमानीने आलेले सरकार आहे. त्यामुळे ते किती काळ चालेल याबद्दल मी कुठलेही भाष्य करणार नाही. आपल्याला लक्षात येईल. मात्र, यापुढे पहाटे शपथ घेणार नाही. योग्य वेळीच शपथविधी तुम्हाला दिसेल, असे सूचक विधान करत त्यांनी अशी गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असे ते म्हणाले.

ज्या दिवशी राज्यात सरकार पडेल त्या दिवशी राज्यात दुसरे सरकार देऊ, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेविषयी देखील भाष्य करत महाविकास आघाडीतील नेत्यांवर पलटवार केला.

चंद्रकांतदादांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की, पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत.आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपला आहे.

जसे शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत तसेच देशाचे पंतप्रधान देखील ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचे नेते जेव्हा पंतप्रधानांबद्दल बोलतात त्यावेळेस त्यांना काही वाटत नाही. ज्यावेळी आपण एक बोट दाखवतो त्यावेळी चार बोटे आपल्याकडे आहेत हे या नेत्यांनी विसरू नये, असा चिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला.

पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चेला देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पूर्णविराम दिला. माध्यमांना जेव्हा बातम्या नसतात तेव्हा तुम्ही पंकजा नाराज असल्याच्या बातम्या चालवता. एखाद्या बैठकीला हजेरी न लावणे म्हणजे नाराज आहे, असे होत नाही. एखाद्या वेळीस बातमी कमी पडली तर आम्ही देऊ, पण ही बातमी चालवू नका, असेही ते म्हणाले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संबंधित बातम्या

आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

ग्रामपंचायतची निवडणूक लढवायची आहे? आता ‘या’ व्यक्तीलाच ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहता येणार; ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

September 9, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

वातावरण तापले..! मंगळवेढ्यातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे-पाटलांचा विसर?; पुढारी सत्ताधाऱ्यांसोबत आणि समाज जरांगेसोबत; दुहेरी चेहऱ्याच्या राजकारणाला समाज आता वैतागला

August 28, 2025
मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सुप्रिया सुळेंच विधान चर्चेत; सत्ताधाऱ्यांवर केली ‘ही’ सडकून टीका

मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सुप्रिया सुळेंच विधान चर्चेत; सत्ताधाऱ्यांवर केली ‘ही’ सडकून टीका

August 25, 2025
मोठा झटका! राहुल गांधींना कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

पिक्चर अभी बाकी है..! व्होट चोरीवरुन राहुल गांधींचा भाजपला इशारा; गांधींच्या प्लॅनने वाढवलं भाजपचं टेन्शन?

August 13, 2025
रेनबो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलमुळे सलगर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार, उद्याच्या उज्वल पिढीला साक्षरतेचे पैलू पडतील; आ.समाधान आवताडे यांचे गौरोउद्गार

रेनबो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलमुळे सलगर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार, उद्याच्या उज्वल पिढीला साक्षरतेचे पैलू पडतील; आ.समाधान आवताडे यांचे गौरोउद्गार

August 8, 2025
मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

खळबळ! एकनाथ शिंदे कर्णासारखे दानशूर, 40 वर्षाच्या राजकीय जीवनात असा माणूस पाहिला नाही; शरद पवारांचा आमदार शिंदेंच्या प्रेमात

August 5, 2025

माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला! ‘कृषी’ गेले, आता झाले ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री

August 1, 2025
नागरिकांनो! आमदारांना सरकारमध्ये किमंत नाही, पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी एक ही रुपयाची योजना खेचून आणू शकले नाहीत; अभिजीत पाटील‌ यांनी केले आ.आवताडेंवरती गंभीर आरोप

दिलदार नेतृत्व! आ.अभिजीत पाटील वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम; रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देणार

August 1, 2025
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यात राडा; बैठक न घेताच गावातून हताशपणे लागले परतावे

खळबळ! खा.प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला मंगळवेढ्यात जोडे मारून केले प्रतिमा दहन; काँग्रेसकडून त्याच ठिकाणी शिंदे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक; नेमके काय आहे प्रकरण?

July 30, 2025
Next Post
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

गुजरात,गोवा,राजस्थान,नवी दिल्ली राज्यातून येणाऱ्या नागरिकांना आता कोरोना निगेटिव्ह असेलच महाराष्ट्रात प्रवेश मिळेल

ताज्या बातम्या

आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे, कुठे मिळेल, अर्ज कसा करावा? अर्जाची प्रक्रिया कशी असेल? प्रमाणपत्र काढण्यासाठी ‘ही’ आहेत आवश्यक कागदपत्रे

September 12, 2025
शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

सरकारी काम झाले सोपे! आता सरकारी सेवा थेट व्हॉट्सअपवर मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

September 12, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

September 12, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धू-धु धुतले! जुन्या भांडणाचा राग मनात धरून युवकावर पीव्हीसी पाइपने मारहाण; खिशातून जबरदस्तीने काढले पैसे; मंगळवेढा तालुक्यातील घटना

September 11, 2025
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

खळबळ! अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या मंगळवेढ्यातील ‘या’ ५ वाळू माफियांवरती गुन्हा दाखल; महसूल व पोलिसांच्या पथकाची कारवाई

September 11, 2025

धक्कादायक! प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवेढ्यातील महिलेचा मृत्यू; डॉक्टरसह सेविकेवर गुन्हा

September 11, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा