टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी 85 अहवाल पॉझिटिव्ह आले असून कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकाच दिवशी 156 कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज कोरोना चाचणीचे 1 हजार 903 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 818 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 85 अहवाल पॉझिटिव्ह आले
कोरोना चाचणीचे 40 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 33 हजार 448 झाली आहे.
कोरोना मुळे आतापर्यंत ग्रामीण भागातील 998 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 1 हजार 607 बाधितांवर उपचार सुरू आहेत.
ग्रामीण भागातील 30 हजार 843 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत.
आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये पंढरपूर तालुक्यातील उंबरे पागे येथील साठ वर्षिय पुरुष,
पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथील 50 वर्षीय महिला, माढा तालुक्यातील बेंबळे येथील 70 वर्षीय पुरुष आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर येथील 75 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज