टीम मंगळवेढा टाइम्स ।
मित्राच्या आईला पंढरपूर येथील एका हॉस्पिटलमधून पाहून येत असताना पाठीमागून टेम्पोने जोराची धडक दिल्याने तात्यासो तुळशीराम चौगुले (वय.28, रा.मल्लेवाडी ता.मंगळवेढा) याचा जागीच मृत्यू झाला आहे तर गणेश गोडसे (वय.28 रा.सिद्धेवाडी ता.पंढरपूर) हा गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना मंगळवेढा-पंढरपूर रोडवरील एकलासपूर गावाजवळ काल रविवारी रात्री 12 च्या सुमारास घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत तात्यासो चौगुले हा व त्याचा मित्र गणेश गोडसे हे दोघे मित्राची आई आजारी आहे म्हणून तिला पाहण्यासाठी पंढरपूर येथे गेले होते.
पंढरपूर येथून मंगळवेढ्याच्या दिशेने येत असताना एकलासपूर गावाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिल्याने तात्यासो चौगुले याच्या डोकिस जबर मार लागल्याने तो जागीच मयत झाला.
गणेश गोडसे यासही जबर मार लागल्याने त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मयत तात्यासो चौगुले त्यांच्या पश्चात आई वडील, भाऊ असा परिवार आहे. ऐन दिवाळीत मयत झाल्याची माहिती समजताच ते राहत असलेल्या मल्लेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज