तुमच्या अंगावर पेट्रोल टाकतो आणि मी ही पेटवून घेतो असं म्हणत त्याने वाहतूक पोलिसाच्या अंगावर ओतले पेट्रोल आणि प्रचंड गोंधळ घातल्याची घटना मोहोळ येथे घडली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावापासून पोलीस जीवापाड कष्ट करीत आहेत काहीही घडले की पोलिसांच्याच खांद्यावर ओझे पडते आणि दोन्ही बाजूनी पोलिसांवरच अन्याय होतो हे वारंवार दिसून येत असताना मोहोळ येथे दुचाकीस्वाराला दंड आकाराला म्हणून वाहतूक पोलिसाला पेटवून देण्यापर्यंत मजल गेली आहे.
समाधान वामन ढावरे (वय.30 रा.तांबोळे रोड , मोहोळ) हा दुचाकीस्वार मास्क न घालता आपल्या दुचाकीवरून निघाला असता वाहतूक पोलीस नाईक विठठल पठाडे यांनी त्याला थांबवले आणि दंडाची आकारणी करीत असल्याचे सांगितले.
– अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा! नुकसान झालेल्यांना अशी मिळणार सरकारी मदत ‘हे’ चार घटक महत्वाचे
– मंगळवेढ्यात तलवारीने खुनी हल्ला; सरपंच पुत्रासह 6 जणांना 30 ऑक्टोबर पर्यत पोलीस कोठडी
– मंगळवेढ्यात वीजेचा धक्का लागून 26 वर्षीय वायरमनचा जागीच मृत्यू
दंडाचे नाव ऐकताच दुचाकीस्वार समाधान ढावरे हा संतापला. वाहतूक पोलीस दंडाची पावती करण्याचे सांगत असताना तो पोलिसांशी वाद घालू लागला. ही वादावादी सुरु असतानाच त्याने वेगळाच पवित्र घेतला . ‘ तुमच्या अंगावर पेट्रोल टाकतो आणि मी ही पेटवून घेतो असे म्हणत त्याने तसा प्रयत्न केला.
या प्रकाराने एकदम खळबळ उडवून दिली . पोलीस नाईक विठ्ठल पठाडे यांनी याबाबत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ढावरे काहीसा शुद्धीवर आला आणि पोलीस पठाडे हे सतत मला दंडाची पावती करायला लावत असल्याने मी चिडलो रोज रोज मला पाचशे रुपयाची पावती परवडणार नाही.
दारूच्या नशेत असल्याने माझ्याकडून पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याचे ढावरे यांनी सांगितले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
सततच्या दंडाला वैतागून त्याने हे कृत्य केले खरे पण सतत दंड होतोय म्हटल्यावर तरी मास्क लावण्याची दक्षता घेतली असती तर ही घटना टळली असती अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज