सुका मावा बनविणाऱ्या कारखान्यावर मंगळवेढा पोलिसांनी छापा टाकून चार जणांवर कारवाई केली.त्यांच्याकडून दोन लाख ८७ हजारांचा माल जप्त केला. मंगळवेढा-चडचण रस्त्यावरील बालाजीनगर (लमाण तांडा) येथे कासीम नदाफ यांच्या शेतात ही कारवाई केली.
याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्या चारजणांना पोलिसांनी अटक केली आहे.रवी सिद्धप्पा कोळी (वय २४) , परशुराम हनुमंत आवटी (२३) , सुनील सुभाष कोळी (२१) , हनुमंत शरणप्पा आवटी (४५ , सर्वजण रा.चडचण , जि . विजयपूर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,बालाजीनगर येथे रस्त्यालगतच्या एका शेतात सुका मावा बनविण्याचा कारखाना असल्याची खबर पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने कासीम नदाफ यांच्या शेतात छापा टाकला. तेथे मशिन , सुपारी , सुगंधी पावडर असा दोन लाख ८७ हजारांचा माल आढळला. तो पोलिसांनी जप्त केला आहे.
तसेच चार जणांना अटक केली. त्यांच्यावर भादंवि कलम ३२८,१८८,२७२ , २७३ , ५९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई हवालदार सुनील गायकवाड , नाईक हरिदास सलगर , कॉन्स्टेबल पैगंबर नदाफ , मळसिद्ध कोळी , अतुल खराडे , सावंत यांनी केली.याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल संदीप सावंत यांनी फिर्याद दिली असून तपास पोलिस नाईक संजय जाधव हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज