टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत व मराठा समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनलेला आहे. आरक्षण या मागणीसाठी मराठा समाजाने 58 मूक मोर्चे काढले त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे अध्यादेश काढला परंतु गेली अनेक वर्ष हा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित राहिला आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात जास्तीत जास्त मराठा समाजातील नेते आहेत. त्यामूळे महाराष्ट्र राज्यातील सर्वच राजकीय पक्ष व त्यांच्या प्रस्थापीत नेत्यांनी मराठा समाजाला आरक्षनाच्या नावाखाली मराठा समाजातील लोकांची कायम दिशाभुल करुन फसवणुक केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्या अगोदर आरक्षण मिळाल्याची आवाई उठवून अक्षरशः जनतेची दिशाभुल केली असल्याने या कुचकामी सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात व उध्या त्याना धडा शिकवण्यासाठी तमाम मराठी बांधवांना एकत्र येने ही काळाची गरज बनली आहे.
शिक्षण व नोकरीमध्ये कायम स्वरुपात आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्यासाठी पूढे आले पाहिजे. किंवा त्याना गावात येऊ दिले नाही पाहीजे. तरच नेत्यांचे डोळे उघडतील . सर्वच राजकीय पक्षांचे नेते आतातरी आपण जागे व्हा मराठा आरक्षणाची निन्रायक लढाई आता मराठा समाजातील प्रत्येक घटकानी हाती घेतली पाहीजे.
आता मराठा समाजाची सहनशीलता संपलेली आहे तेवढेच लक्ष्यात ठेवा . पूढे कोणत्याही आश्वासणास बळी पडता कामा नये मराठा समाजाने राजकिय नेत्यांना बाजुला ठेऊन मराठा समाजासाठी संघटीत झाले पहिजेल. असे मत राजे प्रतिष्ठान व राजे प्रतिष्ठान कामगार सेना मंगळवेढा शहर अध्यक्ष सुदर्शन ताड यानी केले आहे.
जोपर्यंत सरकार मराठा आरक्षणाची भुमिका स्पष्ट करत नाही तो पर्यंत असहकार आंदोलन मराठा समाजाने घोषीत करावे. अशी भूमिका देखील सुदर्शन ताड यानी मांडली.
मराठा समाजाने आतापर्यंत सर्वात शांत भूमिका घेतली पन आता आक्रमक व लढवय्या मराठा समाज कसा असतो ते ईतिहासात पाहिले होते.त्याची पुनवरावर्ती करण्याची वेळ आता आली आहे आता सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन आपण आपल्या हक्कासाठी लढले पाहिजेल.
Maratha community should not trust political party: Raje Pratishthan Kamgar Sena’s appeal
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज