टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरणक्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने धरणातून मंगळवारी सकाळपासून विसर्ग वाढविण्यात आला आहे.
सायंकाळी सहा वाजता 50 हजार 600 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे, तर वीर धरणामधून एक हजार क्युसेक असा 51 हजार 600 क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे.
यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागा (भीमा) नदीला मात्र पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे बुधवारी सकाळपर्यंत चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिराला पाण्याचा वेढा पडणार आहे, तर विष्णुपद बंधारा व दगडी पूल पाण्याखाली जाणार आहे.
विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने चंद्रभागेला पुन्हा पूरस्थिती उद्भवणार आहे.
उजनी धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. त्याचबरोबर नीरा खोरे, देवघर, वीर धरणे भरली असल्याने यामधून मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरू आहे.
धरणे 100 टक्के भरल्याने कालवा प्रशासनाने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 50 हजार 600 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे,
तर वीर धरणातून एक हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. यामुळे पंढरपूर येथे 60 हजारांचा विसर्ग होणार आहे. भीमा नदीपात्रात मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीला पूर येऊ लागला आहे.
सतर्कता म्हणून जिल्हा व तालुका प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हे बंधारे जाणार पाण्याखाली
उजनीतून 50 हजार 600, तर वीरमधून एक हजार असा 51 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू आहे. आणखी यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 25 हजार क्युसेकला दगडी पूल पाण्याखाली जात आहे.
तसेच मुंढेवाडी, पुळूज येथील बंधारे पाण्याखाली जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, तर चंद्रभागा घाटाच्या पायरीला पाणी लागण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज