टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनीषा आव्हाळे यांनी सन 2024 25 या सालातील जिल्हा परिषदेचे 48 कोटी 11 लाखाचे अंदाजपत्रक सोमवारी दुपारी यशवंतराव चव्हाण सभागृहात सादर केले
ग्रामीण भागातील दिव्यांग, मागासवर्गीय विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील मुलींना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना अर्थिक मदत करणे यासाठी अंदाजपत्रकात 50 लाखाची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी दुपारी दोन वाजता आपल्या बजेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केले त्यानंतर सभागृहात हे बजेट सादर करण्यात आले.
सन २०२३-२४ चे मूळ अंदाजपत्रक रक्कम रु.४५०६,६८ लक्ष चे होते. सन २०२४-२५ च्या मूळ अंदाजपत्रकात रक्कम रु.३०४.९९ लक्ष इतकी वाढ करुन रक्कम रु.४८११.६७ लक्ष चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
*अ प्रशासन:-
कर्मचा-यांचे कामकाजात प्रशासकीय गतिमानता आणनेसाठी व गुणवत्ता वाढीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करणेसाठी तरतूद करणेत आलेली आहे.
कृषि विभाग-
कृषि विभागासाठी मागील वर्षाच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.२.०० लक्ष इतकी वाढ करुन कृषिसाठी एकूण र.रु.३७२.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
कृषि अभियांत्रिकी योजनेंतर्गत ट्रॅक्टर चलित औजारे, ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, रोटरी टिलर यासाठी रक्कम रु.१००.०० लक्ष इतकी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. जेणेकरुन सोलापूर जिल्हयातील शेतक-यांना आधुनिक औजारांचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल, याची काळजी घेतली आहे.
• शेतकरी व पशुपालक यांचेसाठी कडबाकुट्टी, ताडपत्री, स्लरी फिल्टर या सुधारित औजारांचा वापर व्हावा, म्हणून रक्कम रु.११०.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
*पशुसंवर्धन विभाग
पशुसंवर्धनसाठी एकूण ३३६०४ इतकी तरतूद केलेली आहे, पशुंच्या दुग्ध वाढीसाठी जीवनसत्व औषध पुरवठा करणेसाठी रक्कम 40 लाख तर, दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी वंध्यत्व निवारण कार्यक्रम अंतर्गत 30 लक्ष,
• आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या शेतकरी व शेतमजूर यांना चार शेळया व एक बोकड वाटप योजनेसाठी रक्कम रु.४०.०० लक्ष,
• पशुपालकांना मिल्कींग मशीन पुरविणेसाठी रक्कम रु.३०.०० लक्ष इतकी तरतूद करणेत आलेली आहे.
* सार्वजनिक आरोग्य विभाग:-
आरोग्य विभागासाठी एकूण र.रु.३९७.३१ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे. आरोग्य विभागासाठी योजना अंतर्गत आशा क्लीनिक ही योजना घेण्यात येत असून त्यामध्ये प्रत्येक आशा सेविकांना B.P. मोजणे मशीन, शुगर मोजणे मशीन, वजनकाटा, बैडेन, वाफ द्यायचे मशीन (Nebuliser) अंग शेकायची पिशवी असे कीट द्यावयाचे असून त्यामधून आशा क्लिनिक तयार होईल, यासाठी रक्कम रु.२४.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
• प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये Labour Room चे आधुनिकीकरणासाठी रक्कम रु.३०.०० लक्ष प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी औषधे खरेदीसाठी र.रू.१००.०० लक्ष,
• श्वानदंश लस, सर्पदंश लस खरेदीसाठी रक्कम रु.३०.०० लक्ष,
• जिल्हास्तर/तालुकास्तर/प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर/उपकेंद्र स्तर बीज, पाणी, दुरध्वनी, इंधन, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया सर्जन वाहन इंधन साठी रक्कम रु.१००.०० लक्ष
• ग्रामीण जनतेला असाध्य रोगावरील उपचारासाठी अर्थसहाय्य यासाठी र.रु.२०.०० लक्ष,
प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्राकडील जैव घनकचरा विल्हेवाट लावणे यासाठी र.रु.३०.०० लक्ष,
* समाजकल्याण विभाग :-
समाजकल्याण विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.३३.७७ लक्ष इतकी वाढ करुन समाजकल्याण विभागासाठी एकूण र.रु.४७५.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
• ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे यासाठी रक्कम रु.१५.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
• ग्रामीण भागातील मागासवर्गीय जनतेच्या विकासासाठी ५ व ७.५ HP विद्युत मोटार पुरविणे साठी रक्कम रु.३०.०० लक्ष,
• इ.५वी ते ९वी च्या मागासवर्गीय मुलामुलींना सायकली पुरविणे साठी रक्कम रु. २०,०० लक्ष,
मागासवर्गीयांना शेळीपालन गट अनुदान रक्कम रु.३०.०० लक्ष,
• ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणासाठी रक्कम रु.४००० लक्ष,
• व्यवसाय व तांत्रिक प्रशिक्षण योजनांतर्गत Tally (संगणक) प्रशिक्षणासाठी रक्कम रु.२५.०० लक्ष इतकी तरतूद करणेत आलेली आहे.
• अपंग व्यक्तींना स्वयंचलित सहायभूत साधने व तंत्रज्ञान करीता अर्थसहाय्य देणे या योजने अंतर्गत ई-रिक्षासाठी रक्कम रु. ४९.०० ला,
• अपंग व्यक्तींना उद्योजकता व कौशल्य विकास शिबीर आयोजित करणेसाठी रक्कम रु.२०,०० लक्ष,
• अपंग व्यक्तींना शेळीपालन गट अनुदानासाठी रक्कम रु.४२.०० लक्ष,
ग्रामीण भागातील दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी एपर्धा परीक्षा पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे यासाठी रक्कम रु.२०.०० लक्ष,
• दिव्यांग मुलांना विशेष उच्च दर्जेचा उपलब्ध करुन देणेसाठी अनुदान रक्कम रु.२५.०० लक्ष इतकी तरतूद करणेत आलेली आहे.
* महिला व बालकल्याण विभाग :-
महिला व बाल कल्याण विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.४६.०१ लक्ष इतकी वाढ करुन महिला व बाल कल्याण विभागासाठी एकूण र.रु.३६७.०७ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
• ग्रामीण भागातील मुलींना स्पर्धा परिक्षा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलींना आर्थिक मदत करणे यासाठी रक्कम रु.१५.०० लक्ष इतको तरतूद केलेली आहे
ग्रामीण भागातील महिलांना विविध साहित्य पुरविणे यासाठी रक्कम रु.८०.०० लक्ष,
• अंगणवाड्यांना विविध साहित्य/ शैक्षणिक उपयोगती साहित्य पुरविणे यासाठी रक्कम रु.८०.०० लक्ष इतकी तरतूद करणेत आलेली आहे.
* ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
:- ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.६१.०० लक्ष इतकी वाढ करुन पाणी पुरवठा विभागासाठी एकूण र.रु.२९१.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
* लघु पाटबंधारे:-
लघु पाटबंधारे विभागासाठी एकूण र.रू.२००.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
* शिक्षण विभाग :-
शिक्षण विभागासाठी एकूण र.रु.५४०.१८ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
• विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेकरिता शेक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दणे, खडूमुक्त शाळा, White Board Science Wall यासाठी रक्कम रु.७५.०० लक्ष,
• जि.प. शाळांमध्ये बेंच खरेदीसाठी व क्रिडा साहित्य उपलब्ध करुन देणेसाठी प्रत्येकी र.रु.२०.०० लक्ष,
• जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या देखभाल, दुरुस्ती, अमृत रसोई तयार करणे तसेच शाळेत बीज बचत होणेसाठी सोलर युनिट बसविणे व इतर अनुषंगिक खर्चासाठी रक्कम रु.२५०.०० लक्ष इतकी भरीव तरतूद करणेत आलेली आहे.
* बांधकाम विभाग :-
बांधकाम विभागासाठी र.रू.११०५.०१ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
यामध्ये प्रामुख्यान जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी व्यापारी गाळे बांधणेकामी रक्कम रु.५०.०० लक्ष इतकी तूरतूद केलेली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज