टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेली वाळू टंचाई आता दूर होण्याची शक्यता आहे. बठाण (ता. मंगळवेढा) येथे १६ हजार टन (३५०० ब्रास) गाळ मिश्रीत वाळू उपलब्ध झाली असून ठेकेदारांनी डेपो भरून घेतले आहेत.
पोर्टलवरून लोकांना त्याची मागणी नोंदवता येणार आहे, त्याचा दर प्रती ब्रास ६०० रुपये असा आहे, अशी माहिती मंगळवेढ्याचे तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.
जिल्ह्यात एकीकडे अधिकृतपणे वाळू उपशाला बंदी आणि दुसरीकडे अनधिकृतपणे वाळू उपसा करून तो काळ्या बाजारात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु असल्याने वाळूच्या दरानेही उच्चांक गाठला आहे.
त्यातून मार्ग काढण्यासाठी आणि नदीचे पर्यावरण टिकवण्याच्या हेतूने, नदीपात्रातील पाणीक्षमता वाढावी या हेतूने गाळमिश्रीत वाळू काढून ती विकण्यासाठी राज्य शासनाने नियम ठरवून दिले आहेत.
नदीपात्रातील गाळमिश्रीत वाळू काढण्यासाठी पर्याय
महाखनिज पोर्टलवर किंवा सेवा केंद्रावरूनही नोंदणी
वाळूची मागणी करण्यासाठी ‘महाखनिज’च्या पोर्टलवर जाऊन किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागतो. पोर्टलवर गेल्यानंतर तेथे वाळू बुकिंग लिंक आहे. त्यावर जावून रजिस्ट्रेशन करायचे, त्यानंतर पेमेंट ऑप्शनवरून पेमेंट करायचे.
वाळू पोहोच होईपर्यंत ट्रॅकिंग सिस्टिमवर स्थिती पाहता येते. वाळूची मागणी करण्यासाठी आधार नंबर आवश्यक आहे. वाळूची मागणी केल्यानंतर, वाहनाच्या प्रकारानुसार प्रति किमी दर ठरवून घरपोच वाळू दिली जाते.
मात्र त्यासाठी वाळू वाहतुकीचा खर्च नागरिकांना करावा लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना ६०० रुपये प्रती ब्रास किंवा १३३ रुपये प्रती टन इतक्या दराने वाळू मिळू शकते.
बठाण येथून दोन महिने उपसा होत राहणार
बठाण (ता. मंगळवेढा) येथील भीमा नदीपात्रातून गाळमिश्रीत वाळू ठेकेदाराकडून डेपात जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. डेपोत उपलब्ध वाळू ग्राहकांना घ्यायची असल्यास त्यांना ‘महाखनिज’ या शासनाच्या पोर्टलवर मागणी नोंदवावी लागणार आहे.
ती मागणी गुरुवारपासून नोंदवण्यासाठी पोर्टलवर लिंक उपलब्ध झाली आहे. १६ हजार टन म्हणजेच सुमारे ३५०० ब्रास वाळू या ठिकाणाहून मिळणार आहे. त्यासाठी जवळपास दोन महिने हा उपसा होत राहील, अशी माहिती मंगळवेढ्याचे तहसीलदार श्री. जाधव यांनी दिली.
वाळू उपाशासाठी जिल्ह्यातील भीमा नदीतील चार ठिकाणे केली निश्चित
अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या गाळमिश्रीत वाळू उपशासाठी सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी पात्रातील चार ठिकाणे सध्या निश्चित झाले आहेत. त्यातील बठाण येथून वाळू उपलब्ध झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज