टीम मंगळवेढा टाईम्स ।
सलग एकवीस दिवस पावसात खंड पडल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्ह्यातील पिकांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, त्याबाबतचा अहवाल बुधवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सादर केला.
अहवालानुसार जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी ७४ महसूल मंडलातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात एकूण ११० महसूल मंडल आहेत. यापैकी ९१ मंडलात हवामान केंद्र संबंधित यंत्रणा कार्यरत आहे. पैकी ७४ मंडलाचा अहवाल बुधवारी जिल्हा प्रशासनाकडे सादर झाला.
कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाने यांच्या सूचनेनुसार ७४ मंडलात तातडीने पंचवीस टक्के विमा रक्कम देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याची कार्यवाही गुरुवारपासून करावी, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बुधवारी काढली. विमा कंपन्यांनी या आदेशाचे पालन करावे, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
कृषी विभागाकडे प्रस्ताव
उर्वरित १७ मंडलात काही प्रमाणात पाऊस झाला असून, या मंडलाचा प्रस्ताव कृषी विभागाच्या अपर सचिव यांच्याकडे पाठवला आहे. या मंडलातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा रक्कम अॅडव्हान्स म्हणून देण्यात यावी, अशा मागणीचा प्रस्ताव कृषी विभागाकडे पाठविल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली आहे.
महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज