मंगळवेढा टाईम्स न्युज।
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी दि.२० जानेवारी रोजी २९६ अर्जाची विक्री झाली असून दि.२१ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याची माहिती गटविकास अधिकारी जास्मिन शेख यांनी दिली.

जिल्हा परिषद गटासाठी दाखल झालेले अर्ज गटनिहाय पुढील प्रमाणे-
संत दामाजीनगर ४, लक्ष्मी दहिवडी ४, भोसे ५, हुलजंती ०, असे एकूण १३ अर्ज प्राप्त झालेले आहेत. पंचायत समिती गणासाठी पुढील प्रमाणे अर्ज बोराळे २, हुलजंती ३,मरवडे १, संत चोखामेळा नगर दाखल -१, लक्ष्मी दहिवडी ८, भोसे १२, रड्डे २, संत दामाजीनगर ० असे एकूण २९, मरवडे अर्ज प्राप्त झालेले आहेत.

भोसे झेडपी गटासाठी बसवराज पाटील, दाजी दोलतडे, रविकिरण कोळेकर, लक्ष्मी दहिवडी गट-ज्योती सोनवले, प्रतिभा शिवशरण, शितल डांगे.
हुलजंती गट ०,

संत दामाजीनगर सिध्देश्वर धसाडे, सुमैय्या तांबोळी, रमेश भांजे, अमोल टेळ्ये आदींनी अर्ज दाखल केले आहेत.
भोसे जि. प. गटातून दादासाहेब दोलतडे तर भोसे पं.स. गणातून अनिल गरंडे, दामाजी सलगर, प्रवीण मेटकरी यांचा अर्ज दाखल

मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक चर्चेचा असणारा भोसे जिल्हा परिषद गटामधून दामाजी कारखान्याचे संचालक भिवा दोलतडे यांचे सुपुत्र दादासाहेब दोलतडे यांनी अर्ज भरला आहे. याशिवाय भोसे पंचायत समिती गणातून नंदेश्वरचे माजी सरपंच अनिल गरंडे, जिल्हा परिषदेच्या माजी

महिला व बालकल्याण सभापती रतन मेटकरी आणि शिक्षक नेते ज्ञानेश्वर मेटकरी यांचे सुपुत्र प्रविण मेटकरी, नंदेश्वर येथील विश्वमाऊली दूध संस्थेचे चेअरमन दामाजी सलगर या तिघांनी अर्ज दाखल केला आहे.

भोसे जिल्हा परिषद गटावर गेली अनेक वर्षे नंदेश्वर येथील उमेदवारांचा वरचष्मा राहिला आहे. पण चालू जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये नंदेश्वरकरांनी पंचायत समिती गणालाच जास्त पसंती दिली असल्याचे निदर्शनात येत आहे.
जिल्हा परिषद गटातून दादासाहेब दोलतडे यांचा एकमेव अर्ज आला आहे नंदेश्वर गावातून भरला गेला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











