टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्यभर कार्यक्षेत्र असलेल्या रतनचंद शहा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या ११ जागांसाठी १३ उमेदवारांचे अर्ज आखाड्यात राहिले तर ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. १४ हजार ९३२ सभासदांचा कौल दि.२७ जुलै रोजी होणाऱ्या मतदानातून स्पष्ट होणार आहे.
१५ जागांसाठी ३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामधील १८ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात सर्वसाधारण प्रवर्गातील १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एका जागेसाठी दोघांचे अर्ज शिल्लक राहिले.
दामाजीनगर ग्रामपंचायत सरपंच जमीर सुतार यांचा सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोधऐवजी निवडणूक लागली.
चौघेजण बिनविरोध निवडून आले
तर सर्वसाधारण महिला जागेसाठी अश्विनी शहा, गोदावरी दत्तू (महिला राखीव), उत्तम खांडेकर (भटक्या विमुक्त जाती जमाती), किरण क्षीरसागर हे अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात बिनविरोध निवडून आले.
तर राहुल शहा, मुझफ्फर काझी, संतोष बुरकुल, अजिम शेख, अमृतलाल पुरवत, विवेकानंद शहा, नागन्नाथ राऊत, गजानन हजारे, राजेंद्रकुमार जाधव, चंदाराणी कोडुंभैरी, जमीर सुतार, (सर्वसाधारण), महादेव माळी, जमीर सुतार (इतर मागास प्रवर्ग) हे आखाड्यात आहेत.
एका उमेदवारामुळे लागली निवडणूक
सर्वसाधारण प्रवर्गामध्ये दहा जागांसाठी ११ अर्ज राहिले, इतर मागासवर्गीय प्रवर्गात एका जागेसाठी दोनच अर्ज राहिले. सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय मतदारसंघात जमीर सुतार यांचा अर्ज राहिला. केवळ एकाच उमेदवाराच्या सर्वसाधारण प्रवर्गात व इतर मागासवर्गीय मतदार संघातील अर्जामुळे उमेदवार बिनविरोध होण्यापासून रोखले.
सभासद योग्य न्याय देतील
सहकारात बँकेच्या निवडणुका या परवडणाऱ्या नसतात, स्व.रतनचंद शहा यांनी स्थापन केलेल्या बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. सभासद योग्य न्याय देतील, असा आम्हाला विश्वास आहे. – राहुल शहा, सहकार पॅनल प्रमुख
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज