मंगळवेढा टाईम्स न्युज।
मंगळवेढा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली.
दरम्यान, जिल्हा परिषद गटातून 10 तर पंचायत समिती गणातून 15 असे एकूण 25 अर्ज अवैध झाले आहेत. तर शीला सचिन शिवशरण यांचा तीर्थक्षेत्र विकास आघाडी मधील अर्ज एबी फॉर्म मधील नावात बदल असल्यामुळे एबी फॉर्म बाद करण्यात आला. तर शीला शिवशरण यांचा अपक्ष अर्ज कायम राहिला आहे.

तर हुलजंती गटातून शिवसेनेचा एबी फॉर्म असून देखील शपथपत्रावर सही नसल्याने सूर्यवंशी यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा परिषदच्या प्राप्त 62 पैकी 52 उमेदवारी अर्ज वैध तर 10 उमेदवारी अर्ज अवैध ठरले, तर पंचायत समितीत 120 अर्जा पैकी 105 अर्ज वैध व 15 अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओसवाल यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदच्या अवैध अर्जात सिद्धेश्वर डोके, हरिदास बेदरे व बंडू ढोणे यांचा संत दामाजीनगर तर मीनाक्षी सूर्यवंशी हुलजंती, कांचना शिंदे लक्ष्मी दहिवडी व रामदास मिसकर यांचा भोसे गटातून अर्ज अवैध ठरले आहेत.

पंचायत समिती गणातून सुचिता पुजारी, राणी ठेंगील, वैष्णवी कोकरे यांचा संत दामाजीनगर तर दत्तात्रय धायगोंडे यांचा हुलजंती व प्रियांका पवार, उषा पाटील, सायली जाधव, सुधमाती चौधरी यांचा मरवडे तर विक्रम यादव व विलास पाटील यांचा लक्ष्मी दहिवडी गणातून यांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

छाननी प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिल्पा ओसवाल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मदन जाधव आदी उपस्थित होते. यावेळी सर्व उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते.

अर्ज छानणीनंतर आता अर्ज माघार कोण कोण घेणार? आता त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











