टीम मंगळवेढा टाईम्स ।
ऊसतोडणीकरिता १६ कोयती पुरवितो म्हणून मुकादमाकडून उचल घेऊन मजूर न पुरविता २ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केली.
ही घटना ५ जून ते १७ डिसेंबर २०२२ या कालावधीत सांगोला येथे घडली होती. याबाबत नंदू शंकर गायकवाड (रा. लक्ष्मी दहिवडी, ता. मंगळवेढा) यांनी फिर्यादी दिली आहे.
पोलिसांनी हिदायत कशीर शेख व अलीम फत्रू शेख दोघेही (रा. साकुड, ता. आंबेजोगाई, जि. बीड) या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
फिर्यादी नंदू गायकवाड यांचा ऊस तोडणीसाठी कारखान्याला वाहन व तोडणी मजूर पुरविण्याचा व्यवसाय आहे. दरम्यान, दोघा आरोपींनी फिर्यादी राजारामबापू सहकारी साखर कारखाना
लि. जत जि. सांगली या कारखान्याच्या सन २०२२-२४ च्या गळीत हंगामाकरिता ८ पुरुष व ८ महिला असे १६ कोयते पुरवितो सांगितले.
त्यापोटी फिर्यादीकडून वेगवेगळ्या प्रकारे २ लाख २७ हजार रुपये घेतले. कराराप्रमाणे गळीत हंगामाकरिता मजूर पुरवले नाहीत.
उलट त्यास वारंवार विनंती करून देखील उचलीपोटी २ लाख २७ हजार रुपये परत न करता फिर्यादीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज