मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
ऊस वाहतुकीसाठी वाहने आणि कामगार पुरवतो, असे सांगून 3.81 कोटींची फसवणूक केल्याची फिर्याद नागेवाडी (ता. खानापूर) येथील भारती शुगर कारखान्याचे शेती अधिकारी संजय जगन्नाथ मोहिते यांनी विटा पोलिसांत दिली आहे.
दरम्यान, यामध्ये मंगळवेढा येथील विक्रम अर्जुन ढावरे याने देखील साखर कारखान्याची फसवणूक केली असल्याने पोलीस पथक ढावरेच्या शोधासाठी रवाना झाल्याचे समजते.
त्यावरून सांगली जिल्ह्यातील 14, बीड जिल्ह्यातील 4, सोलापूर जिल्ह्यातील 6, धाराशिव आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी 3, वाशीम आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी 1 अशा एकूण 32 जणांविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 318 (4), 3 (5) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील भारती शुगर अँड फ्युएल हा खासगी साखर कारखाना आहे.
या कारखान्यात संजय जगन्नाथ मोहिते हे शेती अधिकारी म्हणून काम करीत असताना, 23 जून 2023 पासून आजपर्यंतच्या काळात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गोरखनाथ इराप्पा गोपणे, दामाजी बिराप्पा कोळेकर, बाळू आमोघसिध्द माने, रामू आप्पाराय बिळूर, बबन हणमंत कोळेकर (पाचहीजण रा. करेवाडी), सुखदेव कृष्णा करे, पाटलू बाबू तांबे, अरुण जयराम लोहार, आकाश प्रकाश बिळूर (चौघेही रा. तिकोंडी),
संभाजी ताय्याप्पा गडदे, (रा. पांडोझरी), तासगाव तालुक्यातील कृष्णात शशिकांत पाटील (रा. निंबळक), प्रवीण भानुदास पाटील, अक्षय बजरंग पाटील (दोघेही रा. चिंचणी), खानापूर तालुक्यातील दुर्योधन शामराव सावंत (रा. बामणी), बीड जिल्ह्यातील नाळवडी येथील चंद्रकांत रेखू राठोड, यादव गिण्यानदेव चव्हाण, गहिणीनाथ रावसाहेब नागरगोजे (रा. कन्हेवडगाव, ता. आष्टी), राणू मर्निक डोंगरे (रा. कोठारबन, ता. वडवणी),
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शाहरुख रसूल मुढे (रा. कुर्डूवाडी), गणेश रमेश कुंभार, भाग्यश्री संजय कबाडे, हनुमंत सुरेश सरडे (तिघेही रा. सापटणे), विक्रम अर्जुन ढावरे (रा. मंगळवेढा), हनुमंत मल्हारी फलफले (रा. अंजनडोह, ता. करमाळा),
धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील नामदेव पुंडलिक भोरे (रा. टाकळी), बालाजी श्रीकांत करळे, लक्ष्मण सौदागर गोरे (दोघेही रा. करंजा), नाशिक जिल्ह्यातील एकनाथ जेमा राठोड (रा. लोहशिगये), बाळू सूर्यभान मोरे (रा. भालूर, ता. नांदगाव),
हरिभाऊ आंबादास दाभाडे (रा. भौरी, ता. नांदगाव), प्रेमसिंग केशव चव्हाण (रा. तोडगाव, जि. वाशिम), अवधूत सर्जेराव पाटील (रा. इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे)
अशा एकूण 32 जणांनी नागेवाडी कारखान्याच्या कार्यालयात येऊन ‘आम्ही तुम्हाला ऊस वाहतुकीसाठी वाहने आणि कामगार पुरवतो’ म्हणून स्वत:च्या बँक खात्यावर व रोख स्वरूपात एकूण 3 कोटी 81 लाख 55 हजार 200 रुपये कारखान्याकडून नेले आहेत.
मात्र आजअखेर कारखान्यास कोणत्याही प्रकारे वाहन व कामगार न पुरवता कारखान्याची आर्थिक फसवणूक केली आहे, असे संजय मोहिते यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज